वळधा ग्राम पंचायतीचे फुटक्या समाज मंदीराकडे दुर्लक्ष...!
एस.के.24 तास
आरमोरी : तालुक्यातील वळधा गावामध्ये डार्लि रोड आणि बोरी रोडच्या टी पाईंटवर ग्राम पंचायत च्या माध्यमातून समाज मंदिराचे काही वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते, ते सद्यापरीस्थीतीत मोडकडीस आले असून, एक पिल्लर मध्यभागातुनच तुटलेले आहे.
आणी त्याच्या छताला आधार म्हणून गावातील सुज्ञ नागरीकांनाकडून लोखंडी बल्ली लाऊन महत्तवाची कामगीरी केली आहे.अशा तुटलेल्या पिल्लरमुळे भविष्यात कुठल्याही नागरीकांची किंवा त्याठिकाणी खेळ खेळणार्या बालकांची छत कोसळून जिवीतहानी होन्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर समाज मंदिराचे तुटलेले पिल्लर आमच्या प्रतीनिधिंच्या निदर्शनास येताच वळधा ग्राम पंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी गडपायले यांना सदर समाज मंदिराला पाडन्याकरीता सांगण्यात आले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
तरी पंचायत समिती आरमोरी येथील वरीष्ठ अधिकारी यांनी वळधा येथे सदर समाज मंदिराची प्रत्यक्ष पाहणी करून त्यापासुन कुठलीही जिवीतहानी होऊ नये अशी उपाययोजना करावी. भविष्यात जर त्याठिकाणी कुठलीही हानी झाली तर त्यास ग्राम पंचायत अधिकारी जबाबदार असतील असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

