चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून दत्तात्रय समर्थ यांची मूल तालुका ओ.बी.सी. विभाग ब्लॉक अध्यक्षपदी निवड.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून दत्तात्रय समर्थ यांची मूल तालुका ओ.बी.सी. विभाग ब्लॉक अध्यक्षपदी निवड.


राजेंद्र वाढई - उपसंपादक 


चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.यामध्ये दत्तात्रय शामराव समर्थ यांची मूल तालुका ओ.बी.सी. विभाग ब्लॉक अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष रामचंद्र धोटे यांनी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

दत्तात्रय समर्थ यांचे काँग्रेस पक्ष संघटनेतील कार्यकौशल्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मूल तालुका परिसरात काँग्रेस पक्ष आणि विशेषतः ओ.बी.सी. विभाग अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.

आपली नियुक्ती झाल्याबद्दल दत्तात्रय समर्थ यांच्यावर राजकीय व सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करू,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !