गडचिरोली महिला व बाल रुग्णालयात अस्वच्छतेचे सावट ; वैद्यकिय अधिक्षकांचे दुर्लक्ष का मनमानी ? 📍चक्क पिण्याच्या पाण्याजवळच अस्वच्छता असल्याने रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात...!

गडचिरोली महिला व बाल रुग्णालयात अस्वच्छतेचे सावट ; वैद्यकिय अधिक्षकांचे दुर्लक्ष का मनमानी ?


📍चक्क पिण्याच्या पाण्याजवळच अस्वच्छता असल्याने रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात...!


एस.के.24 तास 


गडचिरोली : शहरातील महिला व बाल रुग्णालयातील चक्क रुग्णांना व नातेवाईकांना पाणी पिण्यासाठी वाटर फिल्टरची व जेवण करण्यासाठी टेबलांची सोय केलेली आहे, मात्र चक्क वाटर फिल्टरच्याच बाजुला असलेल्या बेशीन व त्यांच्या बाजुच्या परीसरात अन्नाचा थर व बेशीन मधील पाणी बेशीनमध्येच चोकप होऊन असल्यामुळे रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी आहेत, की नाही तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक स्वच्छतेकडे लक्ष देतात का नाही असे प्रश्न रुग्णांच्या मनात उपस्थित झाले आहेत.

        

विशेष म्हणजे आज दिनांक ७ मे रोजी आमचे प्रतिनिधी महीला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे अचानक भेट देऊन रुग्णालयातील पाहणी केली असता रुग्णालयांतील पिण्याच्या पाण्याचा वाटर फिल्टर जवळील परीसरात अन्नाचे थर जमा झाले असल्याचे व हात धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बीशीनमध्ये पाणी साचून असल्याचे आढळून आले.


चक्क रुग्णालयातच अस्वच्छता असल्यामुळे महीला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांचेकडून रुग्णालयातील सफाई कामगारांवर तसेच परीसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते आहे का जाणीवपूर्वक मनमानी केली जात आहे ? असे रुग्णांकडून तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून बोलले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !