बस मध्ये महिलांना ५० टक्के सूट मिळताच ; कंडक्टरची बेक्कार अवस्था.
एस.के.24 तास
बीड : शासनाने घेतलेला एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के प्रवासमध्ये सूट दिल्यानंतर प्रवासासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, सध्या सोशल मीडियावर लाल परीच्या प्रवासाचा आस्वाद घेण्यासाठी भरगच्च महिला एसटीत चढत असतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर कंडक्टर चक्क एसटी बसच्या सीटाहून तिकीट काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियाच्या व्हिडिओमध्ये दिसत असलेली एसटी बस आणि हा व्हिडिओ नेमका कुठला हे समजू शकला नाही. मात्र, सध्या या व्हिडिओमुळे बस कंडक्टरची तारेवरची कसरत पाहायला मिळाली आणि त्यानंतर बसमध्ये बसणाऱ्या महिलांची तुडुंब गर्दी या दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा भाग ठरत आहेत.
कंडक्टर चक्क प्रवासी बसलेल्या शिटावरून चालत तिकीट काढताना दिसत आहे. हीच तारेवरची कसरत लोकांमध्ये चर्चेचा भाग ठरत आहे. सरकारने ५० टक्के महिलांना सूट दिल्यानंतर महिला १००% प्रवास हा एसटी महामंडळाने करताना आणि महिलांचा वाढता उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

