वनपरिक्षेत्र मुरुमगांव अंर्तगत गजामेंढी ते मोरचुल जवळ वणवा.
★ आगीचे तांडव वनविभागाचे दुर्लक्ष.
एस.के.24 तास
धानोरा : वनपरिक्षेत्र मुरुमगाव अंर्तगत मुरुमगाव ते सावरगाव मुख्य रस्त्या लगत गजामेंढी ते मोरचुल गावालगत वणवा लागला असून वणव्याने आगीचे रुद्ररुप धारण केले होते.
दि.२१ मार्च२०२४ दुपार च्या सुमारास कुणीतरी अज्ञान इसमानी जंगलात वणवा लावला असावा. सदर वणव्याने जनुआगीचे तांडवच दिसत होते.धुर रस्त्यावर येत होता. अगदी २०० फुटावर मोरचुलगाव अंतरावर होते.
आग गावाच्या दिसेने आगेकुच करत होती.भर दिवसा घडलेला प्रकार असुन गस्त घालणारी वनविभागाची गाडी वनविभाग कार्यालयातच उभी होती.सदर एरियाचा गार्ड सुद्धा त्या ठिकाणी गेला नाही.एकंदरीतच वनविभागाचे दुर्लक्ष होते.सदर आगीत वन्य पशुपक्षी,सरपडणारे छोटे प्राणी आगीत भष्म होत होते.
![]() |
| या आधी एस.के.24 तास ला बातमी प्रकाशित करण्यात आली होती. |
भस्मसात झालेत तरच काही मोठे झाडे सुद्धा जळाली.वनविभागाचे अथोनाथ नुकसान झाले.आग सुरुच होती.वनविभागाचे आर.एफ.ओ.विजय कोडापे कार्यालयात हजर नव्हते.आग विझवणारी समिती व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच सावधगिरी बाळगली असती तर हानी टळली असती .


