बच्चू कडू पुन्हा एकदा आंदोलन करणार.
★ ऑनलाइन रमीच्या व्यसनामुळे सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या ?
एस.के.24 तास
मुंबई : ऑनलाइन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकर च्या अंगरक्षकाची आत्महत्या झाल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. “ ऑनलाइन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केली. हे निषेधार्थ आणि संताप आणणारं आहे.सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा.
नाही तर 6 जून शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 7 जून सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार ”, असे आव्हान बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा दिले आहे.या आधीही बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या विरोधात आंदोलन केले होते.