चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी नाशिक,पुणे, छत्रपती संभाजीनगर,नांदेड व जालना परीक्षा केंद्र ; नव्या वादाला तोंड
★ २६१ लिपिक व ९७ शिपाई,अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई, अशा ३५८ पदांच्या भरतीसाठी ३१ हजार १५६ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर २१, २२ व २३ डिसेंबर रोजी होणार आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यातच घेण्यात यावी.नाशिक,पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व जालना जिल्ह्यांचा काय संबंध,असा प्रश्न आता परीक्षार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.