शेतामध्ये अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.
📍एकूण 1,12,240/- रुपयांचा अंमली पदार्थ (गांजा) हस्तगत.
एस.के.24 तास
गडचिरोली जिल्ह्रात अवैध अंमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पाश्र्वभध्र्मीवर गडचिरोली पोलीसांनी दिनांक 19/05/2025 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाया पोलीस मदत केंद्र, मालेवाडा हद्दीमध्ये मौजा दामेश्वर येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 19/05/2025 रोजी पोलीस मदत केंद्र, मालेवाडा पोलीसांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा दामेश्वर येथे राहणारा इसम नामे मोहन यशवंत कोवाची याने त्याचे राहते घरी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगून विक्री करीता साठवून ठेवला आहे.
अशा माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजपत्रित अधिकारी म्हणून पोस्टे कोरचीचे पोनि. शैलेद्र ठाकरे तसेच पोमकें मालेवाडाचे पोउपनि.अभिजीत पायघन व त्यांचे पोलीस पथक मौजा दामेश्वर येथे रवाना झाले.
गोपनिय माहितीमध्ये नमूद संशयीत इसम नामे मोहन यशवंत कोवाची, वय 42 वर्षे, रा. दामेश्वर, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये चार पिवळसर पांढया, हिरवट, करड रंगाच्या चंुगळींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ (गांजा) मिळून आला.
सदर चुंगळ्यांची पंचासमक्ष तपासणी केली असता, दोन रेघट हिरवट रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा 28.050 कि.ग्रॅ वजन असलेला एकुण 1,12,240/- (अक्षरी - एक लाख बारा हजार दोनशे चाळीस) रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळुन आला. आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता, आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याचे कबूल केले.
यावरुन आरोपी नामे मोहन यशवंत कोवाची,वय 42 वर्षे, रा.दामेश्वर,ता.कुरखेडा जि.गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन, पुराडा येथे आज दिनांक 20/05/2025 रोजी अप. क्र. 0059/2025, कलम 8 (सी), 20 (बी) (त्त्) (सी) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि.अभिजीत पायघन हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखालीे पोस्टे कोरचीचे पोनि. शैंलेद्र ठाकरे, पोमकें मालेवाडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि. आकाश नाईकवाडी, पोउपनि. अभिजित पायघन, मसफौ./मंडपे पोहवा/मळकाम, मपोहवा./म्हशाखेत्री, पोना/हुंडरा, पोअं/साजन मेश्राम यांनी पार पाडली.