वैनगंगा विद्यालय कोलारी शाळेचा निकाल १०० %
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्या पासून १५५ कि मी अंतरावर दूर ब्रम्हपुरी तालुक्याचा टोकावर, वैनगंगा नदीच्या तीरावर असणारी हि शाळा वैनगंगा विद्यालय कोलारी जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य १९९१ पासून करीत आहे. या वर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत माहात्मा फुले शिक्षण संस्था द्वारा संचालित वैनगंगा विद्यालय कोलारी शाळेचा निकाल १००% लागला असून, तालुक्यातून एकमेव खाजगी माध्यमाची शाळा असण्याचा मान या शाळेने पटकाविला आहे.
सदर शाळेतून वैभव राजेश्वर बरडे हा विद्यार्थी ७७.४०% गुण घेऊन प्रथम आला आहे तर कु. विदिशा कवळू वासनिक ७६.८० घेऊन द्वितीय तर कु. खुशबू रामदास तुपट ७४.४०% गुण घेऊन तृतीय आली आहे व स्नेहा चंद्रशेखर अंबोने ७३.८० % गुण घेऊन चतुर्थ स्थानी आली आहे.
“ विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे त्यांच्या मेहनतीसह शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या पाठबळाचे फलित आहे. आम्ही यापुढेही शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उंची गाठण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे संस्था अध्यक्ष प्रा.डॉ.देविदास जगनाडे तथा संस्था सचिव प्रा. दिलीप जगनाडे यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय दाते ,वरिष्ठ शिक्षक नागपुरे सर , प्रधान म्याडम ,कोल्हे म्याडम, लिपिक अवसरे ,प्र. परिचर देशमुख ,परिचर रामटेके यांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.