विकास विद्यालय अ-हेरनवरगांव शाळेचा उत्कृष्ट निकाल ९३.२२% लावून कायम ठेवली परंपरा .
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी :१४/०५/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास विद्यालय, अ-हेर नवरगांव येथे दि. १४/५/२०२५ ला शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये विद्यालयातून गुणानुक्रमे प्रथम व प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा अभिनंदन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष म्हणून विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. सतिश पाटील ठेंगरे यांनी प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मंगल धोटे सर व सर्व शिक्षक - शिक्षिका यांच्या उपस्थितीत विद्यालयातून कु.शृती अनिल राऊत ८८℅ व कु. आरती जयेंद्र भागडकर ८४.२०℅ गुण प्राप्त करून प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.