“ कलार समाज सभागृह,नवतळा ” चा लोकार्पण सोहळा मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न.
पुंडलिक गुरनुले - प्रतिनिधी चिमुर
चिमुर : दिनांक ११ मे २०२५ चिमूर तालुक्यातील मौजा- नवतळा येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या संकल्पनेतून व स्थानिक विकास कार्यक्रम निधी २०२३-२४ अंतर्गत साकारलेल्या " कलार समाज मंदिर सभागृह " चा भव्य लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या सभागृहाचे उद्घाटन मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.खा. डॉ.अशोकजी नेते म्हणाले, "माझ्या खासदार निधीतून कलार समाजासाठी हे सभागृह उभारण्यात आले याचा मला अत्यंत आनंद आहे. समाजाने याचा उपयोग सामुदायिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी करावा.
" तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,माझा " पराभव झाला असला तरी विकासाची वाट थांबणार नाही. माझ्या दहा वर्षांच्या खासदारकीत विकासाची अनेक कामे केली आणि भविष्यातही जनतेच्या सेवेत कायम राहणार आहे." त्यांनी लोकसभेतील निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल जनतेचे मन:पूर्वक आभारही मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. कीर्ती कुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया होते.यांनी बोलताना म्हणाले विकासाचे कामे आता थांबणार नाहीत जे जे विकासाचे कामे बाकी आहेत ते ते विकासाचे कामे पुर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतोय.नवतळा या गावाने मला मतदान रुपी भरभरून आशीर्वाद दिला आहे हे मि विसरणार नाही आपला प्रेम माझ्या हृदयात आहे. असे वक्तव्य आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी अध्यक्षीय स्थानावरून केले.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्यामजी हटवादे (भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य), भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पा. झाडे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महादेवजी कोकाटे, उपसरपंच तुळशीदासजी शिवरकर, पो. पा. वंदना जंगिटवार, मधुकरजी मासुरकर, दडमल गुरुजी, रविभाऊ मासुरकर, वनरक्षक गायकवाड, गुरुदेव भक्त दिघोरे ताई, तसेच विविध ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कलार समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम भक्त भगवान पवनसुत हनुमान मंदिरात पारंपरिक पूजाअर्चेने झाली.त्यानंतर लेझीम व ढोल-ताशांच्या निनादात गावातून भव्य फेरी काढण्यात आली. ग्रामस्थ महिलांनी मान्यवरांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
हा लोकार्पण सोहळा नवतळा गावासाठी केवळ एका इमारतीचे उद्घाटन नव्हते, तर सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक एकात्मता आणि विकासाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल होते.