अवकाळी च्या भीतीने शेतकरी बेचैन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : १८/०५/२५ मागील काही दिवसात तुफानासह आलेल्या अवकाळी पावसा ने उन्हाळी धान, फळबागा उध्वस्त केल्या.त्या धक्क्यातून शेतकरी सावरत नाही परत हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार आणि आकाशात जमलेल्या काळ्याकुट्ट ढगांमुळे उन्हाळी धान पीक घेणारे शेतकरी व फळबागेतुन फळांचे उत्पन्न घेणारे शेतकरी यांची चांगलीच धाकधूक वाढलेली दिसत आहे.
उन्हाळी धनपिक घेणारे शेतकरी वाटेल त्या साधनाने उभे असलेले पीक जेवढे हातात येईल तेवढे घेण्यासाठी वाटेल त्या साधनांचा, मशनरींचा वापर करून हिरवा - गाधा धान कापणी करीत आहेत.जेणेकरून पेरणीला जेवढा खर्च आला तो तरी निघेल या अपेक्षेने.