चामोर्शी येथे " यु टर्न " घेताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने दिलेल्या जबर धडकेत कार मधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू ; एक जण गंभीर जखमी,ट्रक चालक फरार.
📍 तिघेही गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्डातील रहिवासी.
चामोर्शी : चामोर्शी वरून आष्टीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला MH.33 अ 0825 महामार्गावर " यु टर्न " घेताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने दिलेल्या जबर धडकेत कारमधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
विनोद काटवे वय,45 वर्ष,राजेंद्र नैताम वय,45 वर्ष, सुनील वैरागडे वय,55 वर्ष तिघेही राहणार गडचिरोली, अशी मृतांची नावे असून चामोर्शी येथील अनिल सातपुते हे गंभीर जखमी झाले आहे.
रविवार,18 मे रोजी विनोद काटवे,राजेंद्र नैताम,सुनील वैरागडे हे लग्न समारंभ करिता चामोर्शी येथे आले होते. त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनाने आष्टीकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी चामोर्शी येथून अनिल सातपुते यांना सोबत घेतले.
दुपारी 1:30 वा.च्या सुमारास चामोर्शी ग्रामीण रुग्णालय समोरील वळणावर त्यांनी अचानक " यु टर्न " घेतला.दरम्यान,त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रक क्रं.CG.04 LW. 0825 जबर धडक दिली.
या भीषण अपघातात कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर अनिल सातपुते गंभीर जखमी झाल्याने त्यांना गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वाना रुग्णालयात दाखल केले.तिघांचा मृत्यू झाला होता.