चंद्रपूर परिमंडळ नवीन कार्यकारिणी २०२५ अध्यक्ष पदी जयपाल(जे पी)मेश्राम व सचिव पदी विवेक पाटील यांची निवड.
एस.के.24 तास
सावली : स्वतंत्र मजदुर युनियनशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची चंद्रपूर परिमंडळ कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली.यामध्ये गडचिरोली सर्कल अंतर्गत ब्रम्हपुरी विभागातून जयपाल (जे पी) मेश्राम यांची चंद्रपूर परिमंडळ अध्यक्ष पदी तर चंद्रपूर सर्कल अंतर्गत चंद्रपूर विभागातून विवेक पाटील यांची परीमंडळ सचिव पदी निवड करण्यात आली.
त्याच बरोबर परीमंडळ कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदी मिथुन शेंडे,अरविंद कातकर, सहसचिव पदी अरविंद राजगडे,प्रविण शेंडे, संघटक पदी कुणाल पाटील, कोषाध्यक्ष पदी प्रितम बारसागडे तर महीला प्रतिनिधी पदी प्रिती दिवटे, उज्वला राहुलगडे यांची निवड करण्यात आली.
वीज कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यावर लक्ष केंद्रित करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर परीमंडळ कार्यकारिणी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन संघटनेचे गडचिरोली सर्कल व ब्रम्हपुरी विभागीय कार्यकारिणीचे नवनियुक्त पदाधिकारी सर्वश्री मा.सर्कल अध्यक्ष एल.आय.थाटकर, सर्कल उपाध्यक्ष राजेश मेश्राम, सर्कल सचिव सुधीर चौधरी, विभागीय अध्यक्ष विकास सेलोटे, विभागीय उपाध्यक्ष विनोद डांगे, विभागीय सचिव केतुल नवघडे
विभागीय सहसचिव प्रकाश भसारकर, केशव मेश्राम, विभागीय कोषाध्यक्ष राजु खोब्रागडे, विभागीय संघटक भारत मसराम, महिला प्रतिनिधी तेजस्विनी बागडे, अश्विनी खोब्रागडे, मीनाक्षी चहांदे,कार्यकारणी सदस्य अक्षय सहारे,सूर्यभान कोवे,अनिल वाकडे, यु. के. सोरदे, श्रीकांत आत्राम यांनी केले व पुढील वाटचाली करिता सदिच्छा देण्यात आल्या.