सावली वनपरिक्षेत्रात जागतिक मधमाशी दिवस साजरा.
एस.के.24 तास
सावली : स्लोहेनियाच्या ॲटन यांशा यांना आधुनिक मधमाशीपालनाचे अग्रगण्य मानले जाते व त्यांच्या सन्मानार्थ 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून घोषित केल्या गेला होता.
तेव्हापासून ॲटन यांशा यांच्या जन्मदिनी 20 मे रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा दिवस मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांच्या पर्यावरणीय महत्त्व बद्दल जागरूकता वाढविण्यासाठी सावली वनपरिक्षेत्रात साजरा करण्यात आला.
मधमाशा फुलांमधून मध गोळा करताना पराग फुलांमधून दुसऱ्या फुलांपर्यंत पोहोचवतात. यामुळे फळे भाज्या व धान्याचे उत्पादन वाढते.अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी मधमाशा अत्यावश्यक असतात. त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळी सुरळीत चालते.
उपस्थित वन कर्मचारी व निसर्गप्रेमी यांना मधमाशांचे पर्यावरणीय,जैविक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.मध,मनी,रायल,जेली, प्रोपोलीस आणि मधमाशी विष यासारख्या उत्पादनाच्या आर्थिक महत्त्व बद्दल तसेच जैवविविधता,वनस्पती पुनरुत्पादन आणि पीक उत्पादनात वाढ होते त्याचप्रमाणे औद्योगीकरणामुळे आणि प्रदूषण कीटकनाशकांचा अतिरेकी वापर यामुळे मधमाशांना धोका होत असल्याबाबत माहिती देण्यात आली.
सदरचा कार्यक्रम श्री.प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व श्री.विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात श्री.रितेश बुर्रीवार स्थापत्य अभियंता,श्री.श्रीराम आदे वनरक्षक राजोली,श्री महादेव मुंडे वनरक्षक सिरसी श्री.सतीश नागोसे वनरक्षक चितेगांव श्री.लंकेश अखाड़े वनरक्षक साधागड श्री.सुखदेव बोनलवार वनरक्षक टेकाडी यांची उपस्थित पार पडला.
जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्याने,मधमाशांचे पर्यावरणीय, जैविक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन करणे आणि आपण सर्वांनी मधमाश्याचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.फुलांची लागवड,सेंद्रिय शेतीचा अवलंब आणि स्थानिक मध उत्पादकांना पाठिंबा देणे या माध्यमातून आपण मधमाशांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करून मधमाशांचे संरक्षण करू शकतो. - विनोद धुर्वे,वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सावली