सावली तालुक्यातील केरोडा (मानापूर हेटी) येथे किरकोळ वादातून युवकाचा खून ; चार आरोपीना अटक.

सावली तालुक्यातील केरोडा (मानापूर हेटी) येथे किरकोळ वादातून युवकाचा खून ; चार आरोपीना अटक.


एस.के.24 तास 


सावली : सावली तालुक्यातील केरोडा (मानापूर हेटी) येथील समीर हरिदास खंडारे या युवकाचा किरकोळ वादातून खून झाल्याची घटना मंगळवारी रात्रौ घडली असून घटनेत सहभागी 4 आरोपी ला अटक करण्यात आली आहे. 


सावली पोलीस स्टेशन अंतर्गत केरोडा (मानापूर हेटी) येथे मंगळवार च्या रात्रौ 7:00 वा.चे दरम्यान गावातील एका किराणा दुकानाजवळ मृतक समीर हरिदास खंडारे याचा गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय वालदे याचे सोबत शाब्दिक बाचाबाची झाली. 


परंतु अभय वालदे याच्या मनात समिरचा काटा काढायचा बेत असल्याने तो व्याहाड खुर्द येथून साईनाथ शेडमाके व पियुष लाटेलवार यांना घेऊन आला.काही कळण्याच्या आत रात्रौ.9:00.वा समीर च्या पोटावर व मांडीवर चाकूने वार करून खून केले. 


ही माहिती गावभर पसरताच नातेवाईकांनी सावली पोलीस स्टेशनला माहिती दिली.सावली चे ठाणेदार प्रदीप पुल्लुरवार आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून चारही आरोपीस अटक केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !