कळमना येथे भगवान शिवजी च्या मूर्तीची स्थापना. - आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई च्या हस्ते विधीवत पुजन.

कळमना येथे भगवान शिवजी च्या मूर्तीची स्थापना. - आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई च्या हस्ते विधीवत पुजन. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास


राजुरा : जिल्हा स्मार्ट ग्राम, स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरण पूरक कळमना येथे भगवान शिवाजी च्या मूर्तीची स्थापना येथील आकसिजन पार्क मध्ये आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विधीवत पुजाअर्चा करून करण्यात आली. हे आक्सीजन पार्क म्हणजे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून साकार झालेले गावातील स्मशानभूमी आहे हे विशेष. कळमना येथे अनेक महापुरुषाचे, देवदेवतांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आलेल्या आहेत हे विशेष. 


गावातील आध्यात्मिक, सामाजिक वातावरण उच्चतम आणि आदर्श असे कायम रहावे, नागरिकांची दिवसागणिक प्रगती व्हावी या उद्देशाने गावातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असून छोट्या छोट्या गोष्टींच्या पुर्णतेतून ईश्वरीय आनंदाचा अनुभव अनुभवत असल्याचे मत आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केले आहे. तर गावकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. 

        

या प्रसंगी ह भ प भुसारी महाराज वनसडी, ह भ प ईश्वर महाराज मासटवार वाजरी केळापूर, ह भ प सुधाकर महाराज कावळकर वनसडी, ह.भ.प.विजय महाराज आंध्र प्रदेश, मुर्ती कार कुळसगे महाराज मांडवा, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, महादेव ताजणे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान कमिटी, जेष्ठ नागरिक भाऊजी वाढई


डॉ.लटारी बल्की, कवडु पिंगे, बापुजी  वाढई, आनंदराव बोढाले, रामदास वांढरे, ग्रामपंचायत उपसरपंच कौशल्या कावळे, सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे,रंजना पिंगे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठल वाढई, सुरेश गौरकार, दत्ताजी पिंपळशेंडे


नानाजी आंबिलकर, गणपती कुकुडे, महादेव आंबिलकर,उध्दव ताजने, वसंता सपाट,भाऊराव कावळे अध्यक्ष न्यु पदावली भजन मंडळ, अशोक कावळे, सुधाकर पिंपळशेंडे, देवराव वांढरे , प्रेरणा ग्रामसघ अध्यक्ष मीनाताई भोयर, हे सर्व उपस्थित होते. 


तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कावळे, अमोल निमकर, विठ्ठल विदे, संतोष बल्की, रामचंद्र कुकुडे, श्रीकांत कुकुडे, संदीप आत्राम,योगराज वांढरे, सुरेश मुठलकर, मारोती विदे, कवडु मुठलकर, सतीश आंबिलकर, कर्म अटकारे, सुभाष सुमटकर, मारोती सपाट, मारोती विददे, राहुल साळवे यासह गावकर्‍यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !