सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमन्यात सांत्वन योजना व ताडोबा व्याघ्र सफारी योजनेचा ग्रामस्थांना लाभ.

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमन्यात सांत्वन योजना व ताडोबा व्याघ्र सफारी योजनेचा ग्रामस्थांना लाभ.


राजेंद्र वाढई                                        उपसंपादक - एस.के.24 तास


राजुरा : राजुरा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम, तसेच स्वच्छ, सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक, आदर्श गाव कळमना चे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या प्रयत्नाने येथे सांत्वन योजना व ताडोबा व्याघ्र सफारी योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी या योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सांत्वन योजने अंतर्गत गावातील कुठलाही मनुष्य स्वर्गवासी झाला त्या दिवशी त्याला ग्रामपंचायत कडून अल्पशी आर्थिक मदत, आरो फिल्टर पाणी, शववाहक साहित्य


साडी चोळी, पुष्पचक्र व मृतकाच्या नावाने आकसिजन पार्क मध्ये एक झाड लावून त्यांची आठवण जोपासली जावी या उदात्त हेतूने अशा प्रकारे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तसेच त्याच दिवशी मृत्यू नोंद व मृत्यू दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि दुसरे म्हणजे ताडोबा व्याघ्र सफारी योजना राबविण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला असून ग्रामपंचायत टॅक्स च्या संदर्भात लोकांना एक सवलत मिळावी व त्यातूनच त्यांना ताडोबा व्याघ्र सफारी करता यावी या हेतूने ही योजना जनतेसाठी राबविण्यात येणार असल्याचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले. 

         

ते पुढे म्हणाले की दिनांक १ एफील ते ३० सप्टेंबर पर्यंत नागरीकानी ग्रामपंचायतमध्ये घरटॅक्स भराणा केल्यानंतर या घरटाक्स भरणाऱ्यांमधून लॉटरी पद्धतीने ड्रा काढला जाईल. ज्या टॅक्स धारकांचा लॉटरी मध्ये नंबर लागेल अशा १० कुटुंबातील पती, पत्नी ला ताडोबा व्याघ्र सफारी करण्यासाठी ग्रामपंचायत दिवाळी सणाच्या पर्वावर  मदत करेल. 

          

या दोन्ही योजना राबविण्यात येत असल्याने ग्रामपंचायत कळमना येथे आनंदाचे वातावरण आहे. अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई हे नाव आता सर्वदूर पर्यंत नावारूपाला आलेले असून असे सरपंच गावागावात निर्माण असावेत अशी भावना व्यक्त केल्या जात आहे. 


या लोकोपयोगी योजना सुरू केल्याबद्दल गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई,  उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, प्रियंका गेडाम, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर देवस्थान कमिटी, महादेव ताजणे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, जेष्ठ नागरिक भाऊजी वाढई, डॉ. लटारी बल्की, कवडु पिंगे, बापुजी  वाढई, देवाजी चाफले, महादेव पिंगे, नत्थु वडस्कर


 पुंडलिक मेश्राम, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठल वाढई, सुरेश गौरकार, दत्ताजी पिंपळशेंडे, गणपती कुकुडे, उध्दव ताजने, वसंता सपाट, महादेव आंबिलकर, सुरेश मुठलकर, मारोती बल्की, मदन वाढई, कवडु गौरकार, पांडुरंग क्षिरसागर , अनिल बोढाले, गजानन गौरकार, विठ्ठल विदे, अमोल निमकर, योगराज वाढरे, रामचंद्र कुकुडे, श्रीकांत कुकुडे, अरुण आस्वले, प्रवीण चिंचोलकर , भुषण ताजने, शंकर गेडाम, दौलत विदे, मीना भोयर अध्यक्ष प्रेरणा ग्रामसघ कळमना प्रेरणा ग्रामसघ सदस्य , संगीता उमाटे


सुचिता धांडे, मनिषा धनकट, सपना मेश्राम, संगीता ताजने, संगीता मारोती अटकारे, सुनिता वाढई, सुनिता गौरकार, सुनिता वाढई, सुषमा पिंगे, प्रियंका बल्की, नुतन आत्राम, अल्का ताई रत्नाकर गेडाम, सुनिता धांडे, अस्मिता कुकुडे, वैशाली आस्वले , शारदा वांढरे, मंदा गेडाम, सविता ताजने, शिला मेश्राम, शारदा ताजने, मंदा वडस्कर, रेखा वाढई, गयाबाई गेडाम यासह नागरीकांनी त्यांचे आभार मानून दोन्ही योजनेचे स्वागत केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !