सांग देवा ! धान मी कसा कापू..? अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...
एस.के.24 तास
ऊभा धान आडवा झाला
चिंतेत शांत कसा झोपू ..
अवकाळी चा पाऊस बांधीत
सांग देवा ! धान कसा मी कापू..१
पाण्यानं तोल सांभाळला असता
पण सोबत तुफान जोराचा..
मोठ्या भरल्या लोंबापाई
तुटला भाग कमरेचा..२
मोठ्या मोठ्या आशेवर
हिशोब खर्चाचा होता लावला
सोयऱ्या- धाय-याची अहीरपट्टी
थोडा घरकुलावर दावला ...३
शिक्षण- पाणी पोराबाराचा
रोवणा - धावना बिजाईसाठी..
खत दवाई मजूर रोज्या
सर्दी-खोकला बिमारी पोटी...४
जमा खर्चाची वही ओली
होत्या आशा मरून गेल्या..
ओलाव्या पायी लोंब वापले
रिकामे पोते रिकाम्या खोल्या..५
कसा जगू कुटुंब पोसू
फुकट रेशन चा गहूतांदूळ खाऊ ? कर्ज बँकेचे बसले उरावर
त्यांचे हप्ते कसे देऊ..? ६
करून सारून नशीबाले भोक
कशी जिंदगी शहाले जाईल..
मरेपर्यंत राबतच राहशील
शापनिसर्गाचाशेतकऱ्यालेखाईल
शापनिसर्गाचा शेतकऱ्यालेखाईल
शापनिसर्गाचा शेतकऱ्यालेखाईल
-
अमरदीप प्रल्हाद लोखंडे.
मु.पो.अ-हेरनवरगांव/ब्रह्मपुरी
जि.चंद्रपुर - ४४१२०६
8308005868