गडचिरोली पोलीस दलाच्या “ प्रोजेक्ट संजीवनी ” अंतर्गत आत्मसमर्पित माओवाद्याच्या मुलीला दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान. 📍दि.05 ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान सदर मुलीला प्रदान करण्यात आला होता कृत्रिम पाय.

गडचिरोली पोलीस दलाच्या “ प्रोजेक्ट संजीवनी ” अंतर्गत आत्मसमर्पित माओवाद्याच्या मुलीला दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान.


📍दि.05 ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान सदर मुलीला प्रदान करण्यात आला होता कृत्रिम पाय.


एस.के.24 तास


गडचिरोली : दि.10/06/2025 गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व  अतिसंवेदनशील  असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. माओवादाची विचारसरणी झुगारून व हिंसेचा मार्ग सोडून निर्भयपणे जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व माओवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2005 साली आत्मसमर्पण योजना सुरु केली. या योजनेच्या अनुषंगाने आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने "प्रोजेक्ट संजीवनी " ची सुरुवात करण्यात आली. 


या प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सुभाष ऊर्फ विनु चुक्कु पोदाळी याच्या मुलीला गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या मार्फतीने दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यात आले. सदर  दिव्यांग प्रमाणपत्र दिनांक 09 जून 2025 रोजी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान  करण्यात आले.

 

दिव्यांग नागरिकांना कृत्रिम हात-पाय आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 05 मार्च ते 11 मार्च 2025 या कालावधीत ‘‘पोलीस दादालोरा खिडकी’’ च्या माध्यमातून “प्रोजेक्ट शक्ती” अंतर्गत मोफत कृत्रिम अवयव वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एकूण 125 दिव्यांग बांधवांना कृत्रिम (हात व पाय) अवयवांचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये  आत्मसमर्पित माओवादी सुभाष ऊर्फ विनु चुक्कु पोदाळी याची मुलगी कु. सपना विनू फोदाळी ही एका पायाने दिव्यांग असल्याने तिला कृत्रिम पाय लावून देण्यात आला.


त्यामुळे तिला चालण्यास व दैनंदिन जीवन जगण्यास मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे कु. सपना विनू पोदाळी ही अहेरी तालुक्यातील इंदिरा गांधी दिव्यांग निवासी विद्यालय बोरी (लगाम) या शाळेत इयत्ता 7 व्या वर्गात शिक्षण घेत असून, तिला सदर दिव्यांग प्रमाणपत्रामुळे शासनाची संजय गांधी निराधार योजना, बस व रेल्वे सवलत तसेच शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेता येणार आहे.


सदर उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !