घरकुल च्या यादीत नाव आलेले नसताना तरी नावावर ५ ब्रास वाळूची उचल ; सावधान तुमचा यादीत नाव नसतानाही तुमच्या नावावर उचल होऊ शकते.
एस.के.24 तास
भंडारा : वाळूचा अवैध उपसा,वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबविण्याच्या हेतूने घरकूल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत दिली जात आहे. मात्र ही योजना कितपत पारदर्शक, नियोजनबद्ध आणि प्रामाणिक पद्धतीने राबविली जात आहे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण भंडाऱ्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दिनांक २३ मे रोजी २०२५ अश्विन शेंडे यांना कोथूरना येथील सुमित नारनवरे यांच्या मोबाईल क्रमांकावरून घरकुल संबंधाने कॉल आला आणि ओटीपीची मागणी करण्यात आली. शेंडे यांनी ओटीपी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ रोजी अन्य एका संपर्क क्रमांकावरून शेंडे यांना पुन्हा कॉल आला आणि परत ओटीपी मागण्यात आली.
शेंडे यांना वाळू उचल केल्याची पावती देण्यात आली मात्र त्यांना मोफत वाळू मिळालीच नाही.त्यामुळे त्यांच्या नावावर उचललेली वाळू नेमकी कुणाला विकण्यात आली, त्यांचे नाव यादीत कसे आले.त्याचा आधारक्रमांक कुठून घेण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित करीत या भ्रष्टाचारात शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची अश्विन शेंडे यांनी केली आहे.