मुल तालुक्यातील मरेगाव येथील युवक वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मरेगाव येथिल युवक नामे मारोती करणशहा पेंदोर वय,31 वर्ष हा नेहमी प्रमाणे आपली घरची जनावरे मरेगाव चितेगाव हद्दीतील शेतशिवारात चराई करिता नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.
ही माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पोहचताच नागरिकांनी पहावयाची एकच गर्दी केली होती सदर घटनेची माहिती ही वनविभागाला देण्यात आली.
वनविभागाचे वनरक्षक श्री.नागोशे व गावातील नागरिक जखमीला उपचाराकरिता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मुल येथे दाखल करण्यात आले सदर घटना ही चितेगाव हद्दीत शेतशिवार सर्व्ह क्र.106 मध्ये श्री.विजय जुमानके यांच्या शेतशिवारात घडली.