सावली वनपरिक्षेत्रात आरोग्य शिबिर संपन्न.
एस.के.24 तास
सावली : दिनांक 10 जून 2015 सावली वनपरिक्षेत्रात वाघ बिबट अस्वल रानटी डुकर व जंगली हत्तींचा सतत धुमाकूळ असल्याने वारंवार मानव वन्यजीव संघर्षाची घटना घडत असतात. त्यामुळे सावली वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी 24 x 7 याप्रमाणे वन्यप्राणी बंदोबस्त, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, वन वणवा, अवैध अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध चराई, तसेच कार्य आयोजना, रोपवन आणि जल व मृद संधारणाची कामे, तेंदू हंगाम न्यायालयीन कामे, शेतपिक व पशुधन हानी नुकसान भरपाई देण्याचे कामात सतत व्यस्त असताना वेळेचे बंधन नाही.
त्यामुळे अनियमित जेवण व क्षेत्रीय कामे करताना मिळेल ते पाणी पिणे या सर्व कारणामुळे वन कर्मचाऱ्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने व आरोग्य सुदृढ असल्याशिवाय कोणतेही काम दर्जेदारपणे व वेळेत करणे शक्य होणार नाही.म्हणून श्री विनोद दुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी मा. श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व मा. श्री विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली मासमो केअर आयुर्वेदिक रिसर्च फाउंडेशन कडून व निवासा होमिओ चिकित्सालय कडून दिनांक 10 जून 2025 रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले.
आयोजित शिबिरास डॉ.माधुरी नाकाडे डॉ.विजय वासनिक संस्थेच्या अध्यक्ष कु.कोहिनूर धृतराज तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमती शिल्पा ठाकरे कु. पूजा साखरकर श्री.सचिन घारपुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सदरचे शिबिराचा साठ वन कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला असून शिबिरास श्री.विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली,क्षेत्र सहायक श्री.राजू कोडापे,श्री.नंदकिशोर पाटील,श्री.रवी सूर्यवंशी, श्री अनिल मेश्राम,व वनरक्षक श्री.राजू मुरकुटे श्री.लंकेश आखाडे,श्री.सुखदेव बोनलवर श्री.भोलेश्वर सोनेकर
श्री.डांगे,श्री एकनाथ खुडे, श्री महेश अहिरकर, श्री दिवाकर गुरूनुले, श्री विनोद उईके व श्रीराम आदे आणि कार्यालयीन कर्मचारी श्री घडसे लेखापाल व श्री सतीश परसावार श्री सुभाष घोडे, श्री पोटे, श्री सीडाम, श्री शेंडे, श्री बंडू दुधे आणि पीआरटी चमू यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मोलाचे सहकार्य केले..