अहेरी पोलिसांनी केली दारूसह ६ लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण ८,२८,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त.

अहेरी पोलिसांनी केली दारूसह ६ लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण ८,२८,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास


अहेरी : वाहनातून दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे, पोलीस उपनिरीक्षक सागर माने, पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे  व पोलीस पथकाने सापळा रचून दारू तस्कराकडून ८ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज रविवार १५ जून रोजी गेर्रा फाटा येथे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचला असता एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने संशयास्पदरीत्या महागाव वरून अहेरी च्या दिशेने येताना दिसल्याने पोलिस स्टाफ ने त्यांच्या जवळील चार चाकी वाहनाने सदरच्या रस्त्यात अडथळा करून येणारे वाहनास हाताने थांबण्याचा इशारा केला.

 सदरचे वाहन पोस्टाफ पासून थोड्या अंतरावर संशयास्पद रित्या थांबले. पोलिस स्टाफ  सदर वाहनाच्या दिशेने चालू लागलो असता वाहनातून एक इसम वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन नजीकच्या झुडपी जंगल मध्ये पळून गेला. 

पोलिस स्टाफ ने सदर इसमाचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. सदर ठिकाणावर वाहनाची तपासणी केली असता एक्सयूव्ही ५०० मॉडेल चे वाहन क्रमांक एमएच ४९ वी ४५५०  येतांना दिसले. या वाहनास हात दाखवून थांबविण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून पळ काढला.

पोलीस पथकाने वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी विदेशी कंपनीची २ लाख २८ हजार ८०० रूपये किमतीची दारू आढळून आली. पोलिसांनी या दारूसह ६ लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण ८,२८,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस शिपाई सुभाष वाकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालक याचे विरुध्द पोस्टे अहेरी अप.क्र. ०१७०/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा  कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा  दाखल केला आहे. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !