जावयाच्या मारहाणीत सासर्याचा मृत्यू.
एस.के.24 तास
अहेरी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन जावयाने केलेल्या मारहाणीत सासर्याचा मृत्यू झाल्याची घटना १४ जून रोजी अहेरी तालुक्यातील महागांव येथे घडली. रमेश दुर्गे असे मृतकाचे नांव आहे तर चंद्रशेखर पवार असे आरोपी जावयाचे नांव आहे.
जावयाने रागाच्या भरात लाथा बुक्क्याने सासर्याचा डोळ्यावर, छातीवर, पाठीवर, तोंडावर केली बेदम मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृतकाची मुलगी आणि जावई कर्नाटकात राहायचे. ते मागील काही दिवसांपूर्वी महागाव येथे आले होते. १४ जून रोजी सासरे रमेश दुर्गे यांनी दारूच्या नशेत आपला जावई चंद्रशेखर पवार यांच्यासोबत ‘तुम्ही इथे कशाला आले ? असा सवाल करत वाद घातला.त्या दोघांमध्ये यावेळी कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात जावई चंद्रशेखर पवार याने सासर्याला मारायला सुरुवात केली.
जावई चंद्रशेखरची पत्नी आपल्या वडील आणि पतीमध्ये सुरू असलेले भांडण सोडवायला गेली. मात्र जावयाने रागाच्या भरात लाथा बुक्क्याने सासर्याचा डोळ्यावर, छातीवर,पाठीवर, तोंडावर बेदम मारहाण केली. यात सासरा रस्त्याच्याकडेला पडला. त्यानंतर सुद्धा जावयाने मारहाण केल्याने सासर्याचा यात मृत्यू झाला.
सासरा मृत रमेश दुर्गे याचा आपल्या पत्नीसोबत नेहमीच वाद व्हायचा. यापूर्वी झालेल्या पती - पत्नीच्या वादात रमेशची पत्नी माया गंभीर जखमी झाली होती. त्यावेळी सासर्यावर पत्नीला मारहाण केल्याने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होता. मृत रमेश दुर्गे हा पत्नीवर संशय घ्यायचा यातून नेहमीच वाद व्हायचे अशी माहिती समोर येत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी चंद्रशेखर पवार याचा सासरा रमेश दुर्गे यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. नुकतेच काही दिवसांपूर्वी जावई आणि मुलगी महागावला आले होते. १४ जून रोजी रमेश दुर्गे यांनी मद्यपान करून घरी वाद घातला होता. त्याच दरम्यान बाहेरून घरी आलेल्या जावयासोबत देखील त्यांनी वाद घातला.
जावयाने सासर्याला केलेल्या मारहाणीत सासर्याचा जीव गेला. तालुका मुख्यालयपासून अवघ्या ७ किलोमीटरवर ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार हर्षल एकरे करत आहेत.