सावली तालुक्यातील चकपिरंजी च्या उपसरपंचावर अपात्रतेचा ठपका ; ग्रामपंचायत फंडातून आर्थिक व्यवहार केल्याचे निष्पन्न.
एस.के.24 तास
सावली : ग्रामपंचायत चकपिरंजी येथील उपसरपंच अरविंद भैसारे यांनी पदावर असतानाही ग्रामपंचायत फंडातुन आर्थिक लाभ घेतल्याची तक्रार प्रफुल निरूडवार यांनी केली होती.तक्रारी च्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत दोषी आढळल्याने अपात्रतेचा प्रस्ताव पंचायत समिती सावली कडून जिल्हा परिषदला पाठविण्यात आला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी यांना पदावर असतांना कोणताही आर्थिक लाभ घेता येत नसतांना येथील सरपंच अरविंद भैसारे व त्यांची पत्नी यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑनलाईन पद्धतीने १० हजार रुपये खात्यात जमा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती.
त्यानुषंगाने विस्तार अधिकारी,श्री.राजु परसावार यांनी संबंधिताचे बयान घेऊन व रेकॉर्डची चौकशी केली असता अरविंद भैसारे यांनी १४ व्या वित्त आयोगातून १० हजार रुपये लाभ घेतले व त्यांची पत्नी हे सुद्धा एकत्र कुटुंबात असतांना मजूर दाखवून त्यांनाही आर्थिक लाभ दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
चौकशी अंती ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ग) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यासंबंधाने उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.काय कारवाई होते.सर्वांचे लक्ष वेधून आहे.