सावली तालुक्यातील ग्रामपंचायत करगाव येथील ग्रामसेवक भ्रष्टाचाराचा विळख्यात.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील करगाव ग्रामपंचायत ही सात सदस्य ग्रामपंचायत असून या ठिकाणी अमोल मेश्राम ग्रामसेवक यांची नियुक्ती केलेली आहे, गावाच्या विकासासाठी सरपंच,उपसरपंच तथा सदस्य तत्पर असून अनेक विकास कामे झालेली आहेत.
परंतु या ग्रामपंचायत मध्ये रुजू असलेले ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे अडचणी निर्माण होत आहेत रुजू असलेले मेश्राम ग्रामसेवक हे सरपंच,उपसरपंच तथा सदस्य यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने विकासासाठी असलेली निधी परस्पर खर्च करण्याची बाब समोर आली आहे.
मासिक सभेत विषय सूचित विषय न घेता किव्हा कुठलेही ठराव न घेता निधी खर्च करण्याचा सपाटा लावला आहे.
15 वा वित्त आयोग निधीतून जवळपास पाच ते सहा लाख रुपये परस्पर खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे.निधी खर्च करताना सरपंच यांना न विचारता रकमेची अफरातफर केली आहे.
तसेच प्रोसिडिंग बुका वरती सभेपुढे विचारात घेतलेले विषय किंवा ठराव यांची नोंद प्रोसेडींगवर नोंदी न लिहताच ग्रामपंचायतचा पदाधिकारी व सदस्य यांना स्वाक्षरी मरावयास सांगणे यावरून यांनी कुठे कुठे माती खाल्ली यांची सखोल चौकशी करून अशा मगरूर व घोळ करणाऱ्या ग्रामसेवक यांचेवर कार्यवाहीकरून निलंबित करण्यात यावी अशी तक्रार ग्रामकमेटीचा वतीने वरिष्टा कडे करण्यात आली.
ग्रामसचिव यांनी आमच्या एकाही सभासदांना विस्वासात न घेता अनेक कामे स्वतः केली असून त्यात खुप मोठा घोळ झाला असल्याचे आम्हचा निर्दशनात आले असल्याने यांची तक्रार वरिष्ठाकेली आहे. - धनराज लांडगे उपसरपंच करगाव.