सावली तालुक्यातील जिबगांव ग्रामपंचायत चे गावातील नाल्या सफाई कडे दुर्लक्ष ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील जिबगाव येथे मेघगर्जने सह जुन महिन्यात पावसाला सुरवात झाली परतु ग्रामपंचायत जिबगांव कडुन गावातील अंतर्गत नाले सफाई चे काम थंड बस्त्यात आहे.हवामान खात्याकडून मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे असून उन्हाळ्यामध्ये अंतर्गत नाल्यांची सफाई व्हायला पाहिजे होती.
परंतु गावातील नाल्यांची सफाई अजूनही केलेली नसल्याने नाल्या सफाईचा विसर पडला की काय असा प्रश्न पडलेला आहे. गावातील अनेक प्रभागातील नाल्या घाणीचे तुडुंब भरून आहे नाल्यातील घाणीचे उपसा करण्यात न आल्याने दुर्गंधी पसरत चाललेली असून त्याचा परिणाम गावातील लोकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.
नाल्यावरती टाकण्यात आलेले स्लप तुटलेले आहे काही ठिकाणी स्लपचे झाकण गायब आहेत त्याकडेही ग्रामपंचायत चे दुर्लक्ष झाले असल्याने पाऊस पाणी घराघरांमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.ह्या सर्व बाबी गंभीर असून ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
जिबगांव येथील नाल्या उपसा करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांना वारंवार सांगीतले जात असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष देत आहेत. नाल्यांची साफसफाई न गावात साथीचे रोग पसरण्याची तसेच घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे करिता लवकरात लवकर गावातील अंतर्गत नाल्यांची साफसफाई करण्यात यावी अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार करणार आहे. - राकेश गोलेपल्लीवार (सदस्य ग्रामपंचायत,जिबगांव)