विद्यार्थी प्रवेश उत्सवाने शाळेत उमटलं स्वागताचं मंगलमय वातावरण.

विद्यार्थी प्रवेश उत्सवाने शाळेत उमटलं स्वागताचं मंगलमय वातावरण.


एस.के.24 तास


मुल : (ता. 23 जून 2025) माउंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, मूल येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.


प्रमुख पाहुणे म्हणून संदीप दोडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद, मूल),किशोर पी.उईके (मंडल अधिकारी, तहसील कार्यालय, मूल), व्यंकटेश जोशी (तलाठी, मूल) व भारती राखडे मॅडम (पालक शिक्षक समिती अध्यक्ष) यांनी उपस्थिती दर्शवली.

तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत शैक्षणिक सल्लागार नाहीद हुसेन (चंद्रपूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रिमा कांबळे मॅडम होत्या.तर उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद व ज्युनिअर कॉलेजचे प्रतिनिधी दुष्यंत गणवीर व्यासपीठावर उपस्थीत होते.विद्यार्थ्यांनी स्वागत गीत,सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक संकल्पनांची सादरीकरणे करून उपस्थितांचे मन जिंकले. 


विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या वर्षाची उमेद दिसून आली.


शाळेच्या वतीने सर्व नवागत विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करत नव्या शैक्षणिक प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पाडले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन भूपेंद्र मोटघरे तर आभार   प्रदशन वामन कवाडकर यांनी केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !