दोन महिण्याची गर्भवती असलेल्या पिडितेने फोडले बिंग ; सेक्स रॅकेट प्रकरणी हॉटेल संचालक संशयाच्या भोवर्यात.
एस.के.24 तास
देसाईगंज (वडसा) : दिल्ली येथील मॉडलिंगच्या व्यवसायात असलेल्या पिडितेचे ब्रम्हपुरी येथील मंजीत लोणारे या ४४ वर्षीय इसमाने लैंगिक शोषण करून तिला देहव्यापारात लोटल्याचे बिंग पिडीतेने फोडले आहे.या प्रकरणी हॉटेल संचालक संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.या हॉटेल संचालकावर पोलीस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
सराईत आरोपी मंजीत लोणारे याने देसाईगंज मधील दोन व कुरखेडा तसेच अन्य ठिकाणच्या हॉटेलात वेश्याव्यवसायाचा अड्डा राजरोसपणे चालवला असतांना याबाबतची पोलिसांना भनकही लागु नये,याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीची २६ वर्षीय पिडित महिला जेव्हा दोन महिण्याची गर्भवती राहुन पोलीस स्टेशन तक्रार केली.तेव्हा प्रकरणाचे बिंग फुटले आहे.
देसाईगंज शहरात अद्यापही अनेक लॉजवर पिडितेने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आल्यास या गोरखधंद्यात आणखी किती हॉटेल,लॉज गुंतले असल्याचा भंडाफोड होणार आहे.
पिडितेच्या अब्रुशी खेळणारे अद्यापही मोकाट असल्याने या गंभीर तेवढ्याच धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.विशेष म्हणजे यातील आरोपी मंजीत सद्या पोलीस कोठडीत आहे.