१४ गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलीसांना यश.
📍वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; विविध गुन्ह्यांतील १६,०५,००० रुपये किंमतीच्या ४२ दुचाकी जप्त.
गडचिरोली : जिल्ह्यात वाहन चोरीचा तपास करतांना पोलिसांच्या हाती आंतरराज्यीय वाहन चोरांची टोळीच हाती लागली असून पोलिसांनी या टोळीस जेरबंद करून १६ लाख ५ हजार रूपये किमतीच्या ४२ दुचाकी जप्त केल्या आहेत.सावरगाव पोलीस मदत केंद्रात दाखल वाहन चोरीचा तपास सुरू असतांना सावरगाव पोलीसांनी आरोपी विनयप्रकाश धरमु कुजुर रा.गजामेंढी ता. धानोरा याची ओळख पटविली होती. पोलीसांनी आरोपी विनयप्रकाश याला अधिक चौकशीसाठी राजनांदगाव कारागृहामधून ताब्यात घेतले होते.
चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने मोटार सायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याबाबत कबूली दिली होती.या दरम्यान आरोपीकडे सदर गुन्ह्यांबाबत सखोल चौकशी केली असता, आरोपी हा आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहन चोरी करुन सदर चोरीच्या वाहनांचे बनावट कागदपत्रे बनवून फसवणुकीने सदर वाहनांची विक्री करत होता असे तपासात निष्पन्न झाले.
यावरुन आरोपीचे साथीदार रवनू दसरु पदा, राकेश छबीलाल बादले , रामु झिकटुराम धुर्वे, सर्व रा.गजामेंढी ता.धानोरा, संजय मुन्ना लकडा,राजेंद्र चूंदा लकडा दोन्ही रा.कवडू ता. राजपुर जि. बलरामपुर (छ. ग.) आणि राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे रा.तळेगाव ता. कुरखेडा यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केली.
१४ गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलीसांना यश
आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने आरोपी विनयप्रकाश याच्यासह सर्व ०७ आरोपींना दिनांक २० जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.पोलीस मदत केंद्र सावरगाव व गडचिरोली येथील स्थानीक गुन्हे शाखा यांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव,कोरची, आरमोरी,पुराडा,कोटगुल,धानोरा येथील पोलीस ठाण्यात तसेच
छत्तीसगड येथे दाखल एकुण १४ गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलीसांना यश आले आहे. याबरोबरच तपासाअंती अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोमकें सावरगाव येथील पोउपनि. विश्वंभर कराळे हे करीत आहेत.