राजश्री शाहू महाराज हे रयतेचे खरे लोकराजे. - प्राचार्य डॉ.शेकोकर

राजश्री शाहू महाराज हे  रयतेचे खरे लोकराजे. - प्राचार्य डॉ.शेकोकर 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,२६/०६/२५" आपल्या देशातल्या जुन्या लोकरुढी,परंपरा बाजूला सारुन समता आणि बंधुता प्रस्थापित करणारे आणि दीन,दलित,शोषितांचे तारणहार,आरक्षणाचे जनक म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज होत,ते रयतेचे खरे लोकराजे होते " असे बहुमोल विवेचन कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त बोलत होते.

     

कार्यक्रमाची सुरुवात  छत्रपतींच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली.प्राचार्य डॉ. शेकोकर,अधीक्षक संगीता ठाकरेंनी माल्यार्पण केले त्यावेळी जयघोष करण्यात आला.यानंतर उपस्थित डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,डॉ पद्माकर वानखडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ किशोर नाकतोडे,डॉ कुलजित शर्मा,डॉ हर्षा कानफाडे,डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ राजू आदे,डॉ अजित खाजगीवाले , पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा अजय खोब्रागडे,रोशन डांगे,जयंत महाजन,प्रज्ञा मेश्राम इत्यादींनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.

    

संचालन डॉ युवराज मेश्राम तर आभार प्रा धिरज आतलानी केले.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ शर्मा, डॉ खानोरकर, जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !