सावली तालुक्यातील पाथरी येथे नवीन ठाणेदार रुजू.

सावली तालुक्यातील पाथरी येथे नवीन ठाणेदार रुजू.


एस.के.24 तास


पाथरी : पाथरीतील जुने ठाणेदाराची बदली झाल्याने नवीन ठाणेदार म्हणून सहायक पोलिस निरीक्षक नितीन डोर्लीकर यांची नियुक्ती झाली आहे.नुकताच त्यांनी पदाचा पदभार स्वीकारले असून पाथरी पोलीस अंतर्गत येणाऱ्या गावातील अवैध धंद्यातील व्यावसायिकात धडगी भरली आहे.

       

सावली तालुक्यातील पाथरी  पोलीस स्टेशनमध्ये 39 गावाचा समावेश आहे.हा परिसर जंगली भागात मोडतो.बरीच गावे जंगलाला लागून आहेत. नवीन ठाणेदारानी पदभार स्वीकारल्यानंतर  त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक चांगली ठेवण्यासाठी  उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.अवैध धंद्यावर कारवाईचे  करण्याचे संकेत दिले आहेत.


नवीन ठाणेदाराची नियुक्ती झाल्याने पाथरी परीसरातील नागरिक प्रभावित झालेआहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले आहेत.नवीन ठाणेदाराचे स्वागत सर्व स्तरावरून करण्यात आले आहे तसेच पाथरी पोलीस स्टेशनचा वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !