सोसायटी च्या अध्यक्ष पदी विलास यासलवार यांची अविरोध निवड.
एस.के.24 तास
सावली : सहकार क्षेत्रात अग्रगण्य आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या शेतकरी सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विलास यासलवार यांची अविरोध निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या सहकार क्षेत्राच्या निवडणुका वर्तमान सरकारच्या काळात कालावधी पूर्ण होत आहेत त्यातच तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मोठे कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी सहकारी सोसायटीच्या निवडणूक नुकतीच पार पडली.
११ संचालक असलेल्या या सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी शंकर डिकोंडवार आणि विलास यासलवार यांचे नाव चर्चेत होते मात्र विलास यासलवार यांची अविरोध निवड करण्यात आली.तालुक्यातील २६ गावांचा समावेश असलेल्या सोसायटीमध्ये ८९१ असे शेतकरी सदस्य आहेत.
माजी नगराध्यक्ष विलास यासलवार यांची अविरोध निवड झाल्याणे त्यांचे सावली न.प.चे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार,रूपचंद लाटेलवार,बाबा मेश्राम,लोकमत दुधे, प्रकाश डोहने,किशोर रामटेके,नारायण सेमस्कार यांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या ....