गडचिरोली येथील रामनगर येथे भाड्याच्या राहत्या घरी पंचायत समिती च्या लिपिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
एस.के.24 तास
गडचिरोली : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आस्थापना विभागात कार्यरत लिपिकाने ताणतणावात व नैराश्याच्या कारणावरून येथे रामनगर भागात भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक,13/6/2025 रोजी रात्रौ 8.20.वा.च्या सुमारास घडली.
अशोक चंद्रशहा हलामी वय,52 वर्ष,रा. धानोरा हमु. रामनगर, गडचिरोली) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना मूलबाळ नव्हते.पती - पत्नी दोघेच वास्तव्य करीत होते. गडचिरोली पोलिसांनी त्यांचा मृतदेह फासावरून उतरवला व जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मूल होत नसल्याने ते तणावात असत. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे,असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.