जिल्हा परिषद शाळा अंतुर्ला येथे हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद शाळा अंतुर्ला येथे हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा अंतुर्ला येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमाचे आयोजन मुख्य महाप्रबंधक देवेश कुमार (धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉ. नायर सर (मुख्य व्यवस्थापक, धारीवाल), ग्रामपंचायत उपसरपंच अनिता जोगी, माजी सरपंच आवडती फुलझले मॅडम, तसेच आशा वर्कर सुमन चांदेकर मॅडम यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमात सुमारे 50 किशोरवयीन मुली व महिलांना हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि वैद्यकीय सुविधांचा लाभ पोहोचवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विना घाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश कामतवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेजल चांदेकर, ज्योती तानकर, माधुरी श्रीवास्तव, धनंजय दळवी, पूजा चतुर, मिथुन कलसार, तसेच गाव विकास ग्रुप यांनी विशेष मेहनत घेतली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !