आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरात टस्कर हत्तींचा हैदोस ; हैदोसाने खरीप हंगाम संकटात.
एस.के.24 तास
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड पाच पांडव परिसरातील आरमोरी मुख्य रस्त्यावर असलेल्या अजय सोमणकार आणि वासाळा मार्गावरील अनेक शेतकर्यांच्या शेतातील पर्ह्यांचे टस्कर हत्तींनी दिनांक १५ जून रोजी मध्यरात्री हैदोस घालून अतोनात नुकसान केल्याचे घटना घडली.यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
जवळपास १७ ते २० च्या संख्येने असलेले टस्कर हत्तीचा कळप जोगीसाखरा ते प्रसिद्ध पाच पांडव देवस्थान कक्ष क्रमांक ७४३ मधून जंगल मार्गे वासाळा जंगल परिसरात मार्गक्रमण करीत असताना आरमोरी रस्त्यावरील अजय सोमणकार यांच्या शेतात ८० किलो धान बीजाइचे दोन पर्हे हत्तींनी पायदळी तुडविले तसेच शेता भोवताल असलेल्या २५ सिमेंट पोलसह तार कंपाऊंडही ध्वस्त केले.
यात शेतकरी सोमनकार यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे टस्कर हत्तीचा कळप वासाळा कक्ष क्रमांक ७४४ मध्ये मार्गक्रमण करीत असताना वैरागड येथील शेतकरी सुधाकर बनकर, अरुण बनकर, विश्वनाथ खंडारकर तसेच अनेक शेतकर्यांच्या धान पर्ह्यांचे नुसकान केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दि.६ मे २०२५ रोजी हत्तींच्या कळपांनी आणि दि. १५ मे २०२५ रोजी सकाळी येथील प्रसिद्ध भावनिक देवस्थान असलेल्या पाच पांडव देवस्थान डूबनारा जंगल परिसरात दोन कळपातून भटकलेल्या तस्कर हत्तीने येथील शेतकर्यांच्या रब्बी धान पिकांची अतोनात नुकसान केल्याची घटना घडली होती. त्यानंतर एकाच महिन्यात दुसर्यांदा हत्तीच्या कळपाने शेतकर्याच्या धान पर्ह्यांचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वन विभागाने हत्तीचा बडोबस्त करावा आणि नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहे.