महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने ब्रह्मपुरी नाभिक समाजाची कार्यकरिणी गठीत.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने ब्रह्मपुरी नाभिक समाजाची कार्यकरिणी गठीत.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नाभिक समाजाचे एकत्रीकरण दिसावे म्हणून, आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे जिल्हा व तालुका कार्यकारणी शासकीय विश्रामगृह येथे गठीत करण्यात आली.ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळातील वरिष्ठ शिष्टमंडळींमार्फत नाभिक समाजाची एक विशेष बैठक घेण्यात आली. 


ह्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.विनायकजी शेंडे सर, तर विशेष मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.अशोकजी सालोटकर सर (पूर्व विदर्भ अध्यक्ष), श्री.घनश्याम सूर्यवंशी (पूर्व विदर्भ संघटनमंत्री) आदी मान्यवर उपस्थित होते .विदर्भाच्या पातळीवर समाजाच्या हितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे ब्रम्हपुरी येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री.प्रदीप मेश्राम सर, यांची पूर्व विदर्भ संघटन सचिव, ह्या पदावर विशेष निवड करून त्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देत, त्यांचा सत्कार करण्यात आली.


ब्रह्मपुरी तालुक्यात नाभिक समाजासाठी स्वे:छिक व निःस्वार्थ मनाने समाजहिताचे कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. ह्यात नवनियुक्त तालुका अध्यक्ष म्हणून श्री.उदयकुमार पगाडे, श्री.आनंद दाणे (उपाध्यक्ष), श्री.विलास दाणे (सचिव)  श्री.श्रावण येळने (कोषाध्यक्ष), श्री.धनंजय पगाडे (सहसचिव).आणि तालुका संघटक म्हणून विलासजी सूर्यवंशी, मयुर मेश्राम, आनंदराव सूर्यवंशी, प्रकाश पगाडे, संजय पगाडे, होमराज पगाडे, राजेश खळसिंगे, विशाल कुंडले,सुभाष दाणे यांची निवड करण्यात आली.


नवनियुक्त महिला तालुका अध्यक्षा म्हणून सौ.रश्मीताई पगाडे, सौ.सुरेखाताई लांजेवार (उपाध्यक्षा), सौ.ज्योती दाणे (सचिव), सौ.किरण सूर्यवंशी (सहसचिव), सौ.मीना सूर्यवंशी (कोषाध्यक्षा)...आणि तालुका संघटिका म्हणून सौ.राधिका लांजेवार, सौ.दिपाली मेश्राम, सौ.संगीता सूर्यवंशी, सौ.शुभांगी शेंडे, सौ.शुभांगी मेश्राम, सौ.अर्चना फुलबांधे, सौ.रजनी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली...ह्या सर्वांना महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे नियुक्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छ्या देत सर्वांचा जाहीर सत्कार करण्यात आला.


तसेच, ह्याच विशेष बैठकीच्या वेळीस,इयता १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये चि.हर्षल होमराज पगाडे ९४.२०, चि.कृनाल प्रदीप सूर्यवंशी (८९.८०, कु.आर्या गजानन सूर्यवंशी ७२.४०ह्या 3 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !