मुल तालुक्यातील नवेगाव भूजला येथे दूषित पाण्याने अतिसाराची साथ ; 11 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल.


मुल तालुक्यातील नवेगाव भूजला येथे दूषित पाण्याने अतिसाराची साथ ; 11 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल.


एस.के.24 तास


मुल : मुल  तालुक्यातील नवेगाव भूजला येथे दूषित पाण्याने अतिसाराची साथ पसरली आहे. शनिवारी सायंकाळी सात आणि रविवारी चार रुग्ण मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. काही रुग्णांवर बेंबाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहे.


याबाबत नवेगाव भूजला येथे वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक लक्ष ठेवून आहे. सध्या येथील परिस्थिती आटोक्यात असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. अस्वच्छता,दूषित व गढूळ पाणीपुरवठ्यामुळे अतिसाराची साथ पसरली असावी असा अंदाज आहे.

तालुक्यातील नवेगाव भूजला येथे नळाद्वारे पाणी पुरवठा मागील दोन वर्षांपासून बंद पडला होता.त्यामुळे येथील पाणी पुरवठा करणार्‍या जलकुंभाची स्वच्छता करण्याता आली नव्हती. पाईप लाइन स्वच्छ करण्याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष होत आहे. असे असताना दोन वर्षानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आल्याने  जंगलेल्या पाईप लाइन द्वारे नळाद्वारे पाणी घराघरांत पोहोचले. 

तेव्हा गावातील नागरिकांनी त्याच गढूळ व दूषित पाण्याचा वापर करणे सुरू केल्याबरोबर शनिवारी आणि रविवारी येथील गावकर्‍यांना हगवण, उलटीचा त्रास सुरू झाला. शनिवारी सात रुग्णांना मूल येथे दाखल करण्यात आले. रविवारी आणखी काही रुग्णांना बेंबाळ आणि मूल येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. परंतू याठिकाणी नियमित डॉक्टर उपस्थित राहत नाही, अत्यावशक सुविधा नाही, त्यामुळे रुग्णांना तात्काळ मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचार साठी नेण्यात आले.

ग्राम पंचायत प्रशासनाने गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित उपाययोजना करावे अशी मागणी नवेगाव भूजला येथील नागरिकांनी केली आहे. रुग्णांना रुग्णवाहिकेमधून मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. नेमके कशामुळे झाले हे सांगता येत नाही.पाणी तपासणी अहवाल आल्यानंतर हे लक्षात येईल.



Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !