मद्यपी डॉक्टरचा प्रताप न तपासता रुग्णास मृत घोषित केले. 📍डेथ मेमो तयार करून शवविच्छेदन करण्याची तयारी सुरू ; डॉक्टरने रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या.दरम्यान रुग्णाने हलचाल.

मद्यपी डॉक्टरचा प्रताप न तपासता रुग्णास मृत घोषित केले.


📍डेथ मेमो तयार करून शवविच्छेदन करण्याची तयारी सुरू ; डॉक्टरने रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या.दरम्यान रुग्णाने हलचाल.


एस.के.24 तास


यवतमाळ : विषबाधा झालेल्या रूग्णास न तपासताच मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनाची तयारी सुरू असताना रुग्णाने हालचाल केली.त्यानंतर त्या रुग्णास यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.आता या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. 


ही खळबळजनक घटना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली. मद्यप्राशन करून कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरच्या कारनाम्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. दारव्हा तालुक्यातील गोरेगाव येथील विषवाधा झालेल्या एका रुग्णाला दारव्हा उपजिल्हा रुणालयात उपचाराकरीता आणण्यात आले.

त्यावेळी सेवेत असलेल्या डॉक्टरने कोणतीही प्राथमिक तपासणी न करता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले व डेथ मेमो तयार करून शवविच्छेदन करण्याची तयारी सुरू केली.रूग्णाच्या नातेवाईकांना हा प्रकार जरा संशयास्पद वाटत होता.डॉक्टरने रुग्णाला शवविच्छेदन गृहाकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या.दरम्यान रुग्णाने हलचाल केली.

डॉक्टर च्या वागण्यामुळे तो नशेत असल्याचा संशय नातेवाइकांना आला.त्यांनी डॉक्टरला रूग्णाची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले,तेव्हा रूग्ण जिवंत असल्याचे आढळले. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरने ‘डेथ मेमो’ फाडून तातडीने रूग्णाचे " रेफर पेपर " तयार केले. या प्रकाराने नातेवाईक चांगलेच संतापले होते. 

रूग्णाची प्रकृती बघता त्याला तातडीने यवतमाळ येथे उपचाराकरीता आणण्यात आले. या रुग्णाला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून येथे रूग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

दारव्हा रूग्णालयातील हा प्रकार उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.राजेश मनवर यांना कळताच त्यांनी तातडीने रूग्णालयात पोहचून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित डॉक्टरला नोटीस बजावली. 

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कानावरही हा प्रकार घालण्यात आला.रूग्णाच्या जीवन मरणाशी खेळ करणाऱ्या त्या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. डॉ.राठोड याला नोटीस बजावण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे डॉ.मनवर यांनी स्पष्ट केले.

सदर डॉक्टरचे रूग्णांसोबतचे वर्तन चांगले नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. काही युवकांनी या डॉक्टरचे नशेत असतानाचे ऑडिओ,व्हिडीओ बनवले आहेत.या डॉक्टरने उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उपचारासाठी आलेल्या टाकळी येथील एका रुग्ण दाम्पत्याशीही गैरवर्तन केल्याची तक्रार आहे.

तसेच शहरातील पंचशील नगर परिसरातील एका गंभीर रूग्णाची तपासणी करताना केवळ डोळे तपासले व उतर तपासणीच केली नाही. त्यामुळे त्या रूग्णावर उपचारास विलंब झाल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात असलेल्या दारव्हा येथील उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार सुधारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !