गोंडपिंपरी - चंद्रपूर मार्गावरील एका वाहनाचा धडकेत बिबट्याचा मृत्यू.
एस.के.24 तास
गोंडपिंपरी : गोंडपिंपरी - चंद्रपूर मार्गावरील आकसापूर गावाजवळ एका वाहनाचा धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार २७ जुलै रोजी सकाळी घडली.जंगलाच्या मार्गात भरधाव वेगात वाहने धावत असल्याने ही घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास गोंडपिंपरी - चंद्रपूर मार्गावर वाहनाने बिबट्याला धडक दिली.या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी बिबट्या मृतावस्थेत पडलेला होता.
वन अधिकारी व कर्मचारी बिबट्याला धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या प्रकरणी अनोळखी वाहन चालक याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.