प्लानेट रेसीडेंसी अहेरी च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
अहेरी : अहेरी : दिनांक,१० जुलै २०२५ गुरुपौर्णिमा या पवित्र दिनाचे औचित्य साधून Planet Residency, अहेरी च्या वतीने आज भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अहेरी बसस्टॉपजवळील महागाव रोडवरील प्लानेट रेसीडेंसी लेआउट येथे तब्बल १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमात कंपनीचे सीईओ पंकज नवलाखे स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत स्थानिक शाळेतील विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, पर्यावरण प्रेमी व कंपनीचे सल्लागार यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या वेळी फळझाडे, सावली देणारी झाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. नुसतेच झाडे लावण्यात आले नाहीत तर त्यांची जबाबदारी घेण्याचा संकल्प देखील उपस्थितांनी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार व पर्यावरण जागरूकतेचे साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी व नागरिकांनी भरभरून कौतुक केले व अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रत्येक झाड म्हणजे नवजीवनाची आशा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वृक्षारोपण करून आपण गुरू व निसर्ग दोघांनाही अभिवादन करतो आहोत. येत्या काळात Planet Residency ला एक हरित आणि सुंदर निवासस्थान म्हणून घडवण्याचा आमचा संकल्प आहे. - पंकज नवलाखे (सी.ई.ओ)