भामरागड तालुक्यात पुराचा धोका पर्लकोटा नदी च्या पाणी पातळीत वाढ.
एस.के.24 तास
भामरागड : भामरागड तालुक्यातून वाहणार्या पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून, नदीच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.सध्या पाणी पातळी ६ मीटरवर पोहोचली आहे.ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भामरागड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. नदीचे पाणी शहरातील सखल भागात शिरण्याची शक्यता आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून,नदीकाठच्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांत छत्तीसगडमध्ये आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.त्यामुळे पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.