अ-हेरनवरगांव व भालेश्वर येथे भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

अ-हेरनवरगांव व भालेश्वर येथे भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव व भालेश्वर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अ-हेरनवरगांव येथील कार्यक्रमात माजी मुख्या.आनंदरावजी रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली गौतम खोब्रागडे, अमरदीप लोखंडे, ध्रुवा खोब्रागडे,संजय मेश्राम

अवंती क-हाडे ,नयना क-हाडे, प्रेरणा मेश्राम,मधुसूदन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितत माजी सरपंच मनोज ढवळे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले . त्यानंतर गावातील बौद्ध उपासक उपासीका यांच्या साक्षीने ध्वजारोहण केले.

ध्वजारोहणानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून भीम रॅलीचे आयोजन करण्यात आले व भीमरॅली डीजे च्या तालावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या त्यांच्या कार्याचा जयजयकार करीत डीजेच्या रोषनाईत नाचत नाचत संपूर्ण गाव पालथा घातला.कार्यक्रमाचे संचालन विशाल जनबंधू यांनी तर आभार मधुसूदन कांबळे यांनी उपस्थितांचे मानले.

दिनांक १४ ते १८ एप्रिल पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमात डॉ राजपाल खोब्रागडे व डॉ रतन तोरघडे यांच्या उपस्थितीतआरोग्य शिबिर घेण्यात आला या शिबिरात जवळपास २०० ते ३०० रुग्णांच्या विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या.भीम जयंती औचित्य साधून विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक सहभोजन व दि.१८ला दुय्यम कव्वाली च्या जंगी मुकाबल्याने भीम जयंती उत्सवाचा समारोप होणार आहे. 

भालेश्वर येथील कार्यक्रमात अमित बनकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.प्रा.देवेश कांबळे, वामन मिसार,मोंटू पिलारे नगरसेवक ब्रह्मपुरी, सुधीर शिवुरकर , अमरदीप लोखंडे,पोलीस पाटील श्रीकृष्ण दिघोरे, सरपंच संदेश रामटेके वामन दिघोरे ,धनराज मेश्राम या अतिथींच्या प्रमुख उपस्थितीत

 शिक्षक घरत यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण केले. आणि ध्वजारोहण करताच उपस्थित संपूर्ण बौद्ध उपासक उपासीका यांनी ध्वजाला मानवंदना दिली.

मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.प्राचार्य देवेश कांबळे यांनी प्राथमिक शिक्षणापासून बाबासाहेब आंबेडकरांनी जभोगलेल्या जातीयतेच्या यातना आणि त्या यातनांपासून समाज बांधवांना मुक्तता मिळवून देण्यासाठी केलेले अथक परिश्रम आणि शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा वापर करून शिकून आपण आपली प्रगती केली व करत रहा.मुलांच्या इच्छेविरुद्ध न जाता मुलांना मुलाच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्यावे. 

शिक्षणावर जास्त भर घेऊन मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाकडे ओढ निर्माण होईल असे आई-वडिलांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे असे कळकळीचे आवाहन उपस्थितांना केले.मेश्राम व घरत सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बनकर यांनीही यावेळी उपस्थितांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर संपूर्ण भालेश्र्वर वाशीयांना भोजनदान देण्यात आले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष रामटेके, प्रकाश खोब्रागडे व समस्त बौद्ध बांधव व गावकरी यांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे संचालन व आभार संघर्ष रामटेके यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !