चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर जवळ एका भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना दिली धडक ; 1 जण जागीच ठार तर 3 जखमी.
एस.के.24 तास
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर जवळ एका भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना धडक दिल्याने 1 जण ठार तर 3 जखमी झाले. जखमीत एका महिलेचाही समावेश आहे. या अपघातात विजय सुखदेव सातपुते वय,48 वर्ष) रा.गोविंदपूर यांचा मृत्यू झाला.
शनिवार दुपारी गोविंदपूर जवळ भरधाव कारने एका दुचाकीला समोरासमोर धडक दिली.यामुळे दुचाकीवरील तिघेही फेकल्या गेले.त्यामुळे दुचाकी वरील विजय सातपुते हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
लता विजय सातपुते वय,40 वर्ष रा.गोविंदपूर),सुधाकर रमेश दुधबळे वय,24 वर्ष,रा.नवेगाव रै.आणि देवेंद्र नामदेव भांडेकर वय,42 वर्ष,रा.नवैगाव रै.) हे जखमी झाले.
कार चालक हरिदास कवडू शेट्ये रा.भाडभिडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.