सावली तालुक्यातील डोनाळा येथील गुराखी वाघाच्या हल्यात जखमी.
📍परिसरातील जनतेनी सतर्क राहण्याचे वनविभाचे आवाहन.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील चार दिवसांपूर्वी चक पेडगाव येथे गुराख्यावर वाघानी हल्ला केल्याची घटना घडली.असताना पुन्हा काल दुपारी 2:00.वाजता च्या दरम्यान तालुक्यातील डोनाळा येथे शेळ्या राखण्याकरिता गेलेल्या जीवन चंद्रशेखर चलाख याच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जखमी केले.
गुराखी आपल्या शेळ्या घेऊन दररोज प्रमाणे जंगल परिसरात गेले असता वाघाने शेळ्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला.शेळ्या इकडे पडाल्याने सरळ तो गुराख्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.गुराखी यांनी आपले प्राण कसे तरी वाचवले व घटनेची माहिती वनविभागाचे कर्मचारी यांना दिली.
घटना माहीत होताच घटनास्थळी जाऊन गुराख्याला ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आलेले आहे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धूर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवन परिक्षेत्र अधिकारी राखुंडे,उपवनपरिक्षेत्र अधिकारी सिडाम साहेब,वनरक्षक डांगे,वनरक्षक महादेव मुंडे,सोनेकर व पिआरटी कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला.