पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे.15,631 पदांसाठी शासन निर्णय जारी.

पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे.15,631 पदांसाठी शासन निर्णय जारी.


एस.के.24 तास


मुंबई : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे.15,631 पदांसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्य पोलीस दलात 15 हजार 631 पदांसाठी भरती होणार आहे.

जीआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई पदासाठी 12,399 जागांवर भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदासाठी 234 जागांवर भरती होणार आहे. बॅण्डस्मॅन पदासाठी 25 जागांवर भरती होणार आहे. सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 2, 393 जागांसाठी भरती होणार आहे आणि कारगृह शिपाईसाठी 580 जागांसाठी भरती होणार आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात पोलीस भरतीसाठी मान्यता देण्यात आली होती. राज्यात पोलीस दलात 15 हजार पदांसाठी मेगाभरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. तर आता मेगा भरतीसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शासन निर्णयात काय म्हटलंय ?


महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.1 जानेवारी 2024 ते दि 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलीस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि.01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.

पदनाम : रिक्त पदांची संख्या
1. पोलीस शिपाई : 12399
2.पोलीस शिपाई चालक : 234
3. बॅण्डस्मन : 25
4 सशस्त्र पोलीस शिपाई : 2393
5 कारागृह शिपाई : 580
एकूण 15631

शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सन 2022 व सन 2023मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आलं आहे.

या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.450/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.350/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !