सावली तालुक्यातील जिबगांव येथे मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा.
📍43 नंदीबैल सजावटी स्पर्धेचे आयोजन,नंदी घेऊन येणाऱ्या सर्व बाल गोपाला ना टिफीन बॉक्स व बॉटल वितरण.
एस.के.24 तास
सावली : जिबगांव परंपरेनुसार यावर्षी सुद्धा तान्हापोळा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला,विदर्भातील हा एक खास सण आहे.जो लहान मुलांच्या हौसेसाठी असतो.या दिवशी लहान मुले लाकडी किंवा मातीचे छोटे बैल सजवून त्यांची मिरवणूक काढतात.तर मोठे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करतात.
हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो,जो शेतीमधील त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाचा उत्सव आहे,जिबगांव युवा मित्रपरीवार जिबगांव तर्फे साजरा करण्यात आला.
युवा मित्रपरिवार जिबगांव तर्फे नंदीबैल सजावट स्पर्धा जुनी हनुमान मंदिर च्या प्रतागणात करण्यात आले.पुरस्कार वितरण करताना व्यासपीठावर युवा मित्र परिवार जिबगांव येथील प्रतिष्ठित नागरीक महिला,पुरुष तथा बाल गोपाला ची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.