50 फूट खोल नदीत कार पुलावरून कोसळली ; चालकाचा घटनास्थळीच मृत्यू.

50 फूट खोल नदीत कार पुलावरून कोसळली ; चालकाचा घटनास्थळीच मृत्यू.


एस.के.24 तास


उमरेड : श्रावणमासाची सांगता झाल्यामुळे हाॅटेलची दारे उघडण्यापूर्वी मासे आणण्यासाठी पवनी जि.भंडारा येथे गेलेल्या उमरेड येथील हाॅटेल मालकाचा भरधाव कार पुलावरून 50 फुट नदी पाञात कोसळल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

हा अपघात रविवार सकाळी 8:00 वा. च्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील मरूनदी पुलावर झाला.सागर मधूकर वाघमारे वय,30 वर्ष रा.उमरेड असे मृत हाॅटेल मालकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार मृतक सागर चे उमरेड येथे राष्ट्रीय मार्गावर हाॅटेल आहे.

श्रावणमासाची सांगता झाल्यामुळे रविवारला हाॅटलेची दारे उघडण्यापूर्वी सागर हा मासे आणण्यासाठी उमरेड येथून पहाटे 5:00 वा.च्या सुमारास आपल्या टाटा हॅरिअर कार क्र.MH.40 CX 7926 ने पवनी येथे गेला होता. परतीच्या प्रवासात भरधाव कारवरील नियंञण सुटल्याने राष्ट्रीयमार्गावरील वळणावरून ही कार अंदाजे पुलावरून 50 फुट खोल नदीपाञात शिरली. नदीपाञात पाणी असल्यामुळे सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच, ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या कारमधून सर्वप्रथम मृतदेह बाहेर काढण्यात आला.त्यानंतर जेसीबी व क्रेनच्या मदतीने कार सुध्दा बाहेर काढण्यात आली. मृतदेह शवविच्छेदणाकरीता रूग्णालयात रवाना करण्यात आला आहे.

ही हॅरियर कार राष्ट्रीयमार्गावरील वळणावर सुरक्षेसाठी ठेवलेले लोखंडी ड्रम व पुलावरील सुरक्षा कठडे तोडून अंदाजे 50 मिटर लांब व 50 फुट खोल नदीपाञात शिरली.यावरून कारचा वेग किती असावा, याचा अंदाज येतो. 

नदीपाञातील पाण्यात बुडालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर सागरच्या डोक्याला एक किरकोळ जखम आढळली.त्यामुळे सागरचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !