राजाराम येथील दलित वस्तीतील जणीत्राचे काम टप्पा ; विद्युत महावितरण विभागाचे कार्यालयात डी पि चे आगमन. 📍उर्वरित काम तात्काळ करावे.अन्यथा आलापल्ली येथे महावितरण विदयुत कार्यलयालाच्या समोर उपोषण करण्याचा राजाराम येथील नागरिक इशारा दिला.

राजाराम येथील दलित वस्तीतील जणीत्राचे काम टप्पा ; विद्युत महावितरण विभागाचे कार्यालयात डी पि चे आगमन.


📍उर्वरित काम तात्काळ करावे.अन्यथा आलापल्ली येथे महावितरण विदयुत कार्यलयालाच्या समोर उपोषण करण्याचा राजाराम येथील नागरिक इशारा दिला.


एस.के.24 तास


अहेरी : जिमलगट्टा विदयुत विभागाअंतर्गत येत असलेल्या राजाराम येथील दलित वस्तीत गेल्या दोन वर्षांपासून नवीन जणीत्र मंजूर करण्यात आले होते.परंतु विदयुत महावितरण च्या निष्काळजी पणामुळे मंजूर झालेले,नवीन जाणीत्र लावण्यात विलंब करीत होते. 


या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ कोरेत यांना निवेदन देताच 5 दिवसात नवीन जणीत्राच्या कामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. 


नंत्तर सदर कंपनीकडे काम देण्यात आले होते.परंतु सदर कंपनीने अर्धवट काम सोडून गेलेत.राजाराम येथील दलित वस्तीत कित्येक वर्षांपासून कमी दाबाचा पुरवठा होत असल्यामुळे आणि पावसाळ्यात डासाचा पादुर्भाव झपाट्याने वाटत असून मलेरिया,टायफाईड, वायरल आणि डेंगू या सारख्या महाभयंकर आजारापासून संरक्षण करावा लागत आहे.भविष्यात रोगराही होऊन दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तसेच विद्युत विभागाचे कार्यालयात 15 दिवसापासून डी. पी.येऊन आहे.परंतु संबंधित कंत्राटदारकाने आणून लावण्यास हयगय करीत असून तातडीने लक्ष देऊन उर्वरित काम तात्काळ करावे.अन्यता आलापल्ली येथे महावितरण विदयुत कार्यलयालाच्या समोर उपोषण करणार असा राजाराम येथील दलित वस्तीतील अध्यक्ष साईनाथ दुर्गे,सचिव भिमराव गोंगले, सामाजिक कार्यकर्ते मधुकर गोंगले, संतोष दुर्गे, रवि दुर्गे, राजेश दुर्गे, विलास दुर्गे, अशोक शेगावकर, सुधाकर गोंगले, व्यंकटेश गोंगले, किशोर गोंगले,आदी नागरिक पत्रकातून केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !